छायाचित्र:  आशिष पाटील                                                              पंगेरेवाडी

 
तांबोशी 
(Lutjanus argentimaculatus)
 
तांबोशी हा अणसुरे खाडीत विपुल प्रमाणात आढळणारा मासा आहे. छोटे व मोठे असे दोन्ही प्रकारचे तांबोशी मासे खाडीत आढळतात. पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या तांबोशी माशाची लांबी २ ते ३ फूट असते. रंग लालसर असतो. वजन साडेतीन ते चार किलो असते. वर्षभर हा माझा खाडीत मिळतो, परंतु पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळतो. सावेला टोकाशी जिवंत मासा अडकवून हा मासा पकडला जातो. हा मासा तळून रस्सा करून खाल्ला जातो. या माशाला सध्या बाजारात ५०० रु./किलो एवढा भाव आहे. 

तांबोशी माशाला इंग्रजीमध्ये Mangrove red snapper, Mangrove jack, किंवा Red purch असेही म्हणतात. अरबी समुद्र, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर या समुद्रांमध्ये व त्यातल्या खाड्यांमध्ये हा मोठ्या प्रमाणावर आढळतो. अलीकडे भूमध्य समुद्रातही हा आढळून आला आहे. याचा आढळ विशेष करून कांदळवन क्षेत्रात असतो, परंतु छोटे मासे गोड्या पाण्यातही आढळले आहेत. खाडीतील छोटे मासे व अन्य जलचर हा याचा आहार आहे. जगभरातील खाद्यसंस्कृतीत तांबोशी मासा लोकप्रिय आहे. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये हा मासा आवडीने खाल्ला जातो.

Share Tweet Follow Share Email Share