तेरडा (Impatiens balsamina)    

तेरडा ही पावसाळ्यात गावात सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात तेरडा भरपूर फुललेला दिसतो. शेतमळ्यांच्या कडेला हा तेरडा हमखास आढळून येतो. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त तीन फुटांपर्यंत असते. फुले गुलाबी रंगाची असतात. पाने लांबडी असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

 (https://vishwakosh.marathi.gov.in/18774/)

Share Tweet Follow Share Email Share