तिवर (Avicennia marina)

तिवर ही अणसुरे खाडी पट्ट्यात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. तिवराचे २० फुटांपर्यंत उंच वृक्ष अणसुरे खाडीपट्ट्यात आढळतात. भराडे, दांडे या भागात तिवरांचे वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. पिवळी बारीक फुले, काजूसारख्या बिया, लहान आकाराची पाने यावरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. कांदळवन पट्ट्यात तिवराची झाडे सर्वाधिक उंच वाढतात. तिवर हे गुरांचे आवडते खाद्य आहे. मोकाट सुटलेली गुरे कांदळवनांत जाऊन तिवराचा पाला खातात. तिवराच्या फांद्या मुद्दाम तोडून आणून गुरांना पाला खायला घालतात. तिवराचा पाला गुरांना दूध वाढीसाठी उपयोगी असतो असे स्थानिक लोक सांगतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (https://en.wikipedia.org/wiki/Avicennia_marina)
तिवर वृक्ष स्थळ - दांडेवाडी
Share Tweet Follow Share Email Share