तुपकडी (Urena lobata)

‘तुपकडी’ किंवा ‘वनभेंडी’ ही वनस्पती गावात पावसाळा अखेरीस सामान्य प्रमाणात आढळते. अणसुरे जनावरांच्या दवाखान्याजवळ रस्त्याच्या कडेने ही वनस्पती आढळून आली आहे. हिची उंची ३ ते ५ फुटांपर्यंत असते. नोव्हेंबरच्या सुमारास या वनस्पतीला गुलाबी बारीक फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

  अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) Flowers of India (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Caesarweed.html)
 
 
 
 
 
 
Share Tweet Follow Share Email Share