तूर

तूर हे गावात भातपिकाच्या जोडीने घेतले जाणारे पीक आहे. भातमळ्यांच्या कडेने लोक तुरीची लागवड करतात. तुरीची व्यावसायिक तत्त्वावर लागवड केली जात नाही, तर घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यापुरती लागवड केली जाते. गावातल्या गावात काही प्रमाणात खरेदी-विक्री होते. तुरीचे गावठी बियाणेच वापरले जाते. गावात पिकणाऱ्या तुरीची उंची ७ ते ८ फुटांपर्यंत असते. तुरीची उसळ, तूरडाळीची आमटी हा गावातल्या लोकांच्या रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे. तुरीच्या झाडाचा उरलेला भाग गुरांना खाद्य म्हणून उपयोगी येतो. तुरीची काडं कुंपणासाठी, मांडव घालण्यासाठी, घराच्या/खोलीच्या छपरासाठी, कुडाच्या भिंतीसाठी उपयोगी येतात. गावात काही ठिकाणी त्यांचा यासाठी उपयोग केला जातो.

Share Tweet Follow Share Email Share