उंबर (Ficus racemosa)
 

उंबराची मध्यम ते मोठ्या उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आहेत. पंगेरे वाडी येथे एका महावृक्षाची नोंद झाली आहे. उंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व असल्याने शक्यतो तोडले जात नाही. गावात काही घरांच्या बाजूला महापुरुष म्हणून उंबराची झाडे जपली गेली आहेत. उंबराचे पाणी काढण्याची पद्धत गावात ज्ञात आहे. उंबराचे पाणी शीतल मानले जाते व पिण्यासाठी, त्वचेला लावण्यासाठी त्याचा पारंपरिक उपयोग करतात. अलीकडे उंबराचे पाणी फारसे काढले जात नाही. उंबराची फळे गुरे व इतर वन्यजीव आवडीने खातात. जिथे उंबराचे झाड आहे तिथे विहिरीला पाणी लागणार अशी गावातील लोकांची समजूत आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://vishwakosh.marathi.gov.in/24698/)

उंबराच्या समिधा धार्मिक कार्यासाठी वापरल्या जातात.
Share Tweet Follow Share Email Share