उंडल (Calophyllum inophyllum)    

उंडल/उंडिल हे गावात खाडीकिनाऱ्याच्या परिसरात सामान्य प्रमाणात आढळणारे झाड आहे. दांडे-पंगेरे परिसरात उंडिलाच्या मध्यम उंचीच्या (१० ते २० फूट) ५० पेक्षा जास्त झाडांची नोंद झाली आहे. काळेकुट्ट खोड, गडद हिरवी पाने, सुरंगीसारखी पांढरी सुगंधी फुले व हिरवी गोल फळे यावरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. उंडिलाच्या झाडाला लोकजीवनात खूप महत्त्व आहे. उंडिलाच्या फळांपासून कडूतेल काढण्याचा घाणा पूर्वी तेलीवाडी येथे होता, मात्र अलीकडे तो बंद पडला आहे. कडुतेल गुरांच्या गोचीड होऊ नये म्हणून फासले जाई. महिला चार कापायला जाताना डास चावू नयेत म्हणून कडुतेल लावीत. पूर्वी वीज नव्हती तेव्हा कडुतेलाचे दिवे लोक वापरीत. उंडिलाचे लाकूड कठीण आणि तेलयुक्त असून होड्या बनवण्यासाठी, तसेच स्मशानात प्रेताला अग्नी देण्यासाठी वापरले जाते. गावात अलीकडे उंडिलाच्या झाडांचे प्रमाण विरळ झाले आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/24694/)

2) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80)

undil-kadutel ghana
undal1
Share Tweet Follow Share Email Share