वागळी
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

वागळी

वागळी हा खाडीत किरकोळपणे आढळणारा मासा आहे. गराने वा जाळ्याने हा मासा पकडला जातो. वागळीचे ‘भाटवागळी’, ‘बोलाड’, ‘पालवी’ असे मुख्यतः तीन प्रकार आहेत. चित्रात दाखवलेली वागळी ही भाटवागळी आहे. आकार गोलसर चौकोनी असतो. या माशाची लांबी-रुंदी ५ फुटापर्यंत, तर गोलाई १५ ते १७ फुटांपर्यंत असते. पंगेरे खाडी येथे सुमारे ५० ते ६० किलोंपर्यंतचे मासे मिळालेले आहेत. हा मासा सरासरी १०० रु. किलोने बाजारात विकला जातो.

 

(माहिती स्रोत – पंगेरे ग्रामस्थ)

Share Tweet Follow Share Email Share