वईनिवडुंग (Euphorbia neriifolia)

वईनिवडुंग ही गावात विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. शेताच्या, बागेच्या कुंपणासाठी, वय करण्यासाठी गावात सर्रासपणे निवडुंगाचा वापर होतो. निवडुंगाची वाढ झटपट होते. उन्हाळ्यात याला बारीक लाल फुलं येतात. वईनिवडुंग जस्तीत जास्त ५ ते ८ फुटांपर्यंत उंच वाढते.
निवडुंगाचा चीक औषधी असतो. गुरांच्या शिंगाला दुखापत झाल्यास निवडुंगाचा चीक लावल्याने जखम भरते अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळते. निवडुंगाचा खत म्हणूनही वापर गावातल्या लोकांकडून होतो. पावसाळ्यात आंब्याच्या झाडांना खतपाणी करताना मुळाशी निवडुंग चोचवून घालतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Indian%20Spurge%20Tree.html)

2) (https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/posts/2736525793328656)








निवडुंग चोचवून ते आंबा कलामांच्या मुंधात नैसर्गिक खत म्हणून घातले जाते.
Share Tweet Follow Share Email Share