छायाचित्र – उन्मेष परांजपे

स्थळ: लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ

वसंत

वसंत हा गावात सामान्य प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. रंग हिरवा व पंख काळसर असतात. मध्यम ते मोठ्या उंचीच्या झाडांवर हा आढळतो. बरेचदा हे पक्षी जोडीने ओरडताना आढळतात. या पक्ष्याचे ओरडणे मार्च ते मे या कालावधीत खास करून ऐकू येते. या पक्ष्याच्या ओरडण्याला गावात ‘टुकरूल घालणे’ असे म्हणतात. माडाच्या खोडात या पक्ष्याने अंडी घातलेली गावात आढळलेली आहेत. पेरू, आशिया, उंबर, खोरेती, पायर इ. झाडांची फळे खातो. 

Share Tweet Follow Share Email Share