वाटणवेल

(Diploclisia glaucescens)

वाटणवेल ही गावात आढळणारी एक दुर्मिळ वनस्पती आहे. वाकीचा वहाळ आणि हुर्से वहाळ या दोनच ठिकाणी ही वनस्पती आढळली आहे. या दोन्ही वहाळांमध्ये ही प्रचंड वाढलेली दिसते. वसंत ऋतूत हिला सोनेरी रंगाचा मोहोर येतो व त्यामागोमाग पांढऱ्या चपट्या फळांनी ही वेल लगडते. पाने हिरवी बदामाकृती मध्यम आकाराची असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

वाटणवेल ही गुळवेलीच्याच कुळातली महावेल आहे. हिला ‘वाटोळी’, ‘रामरक्षी’ अशीही नावं आहेत. प्रा. श्री. द. महाजन यांच्या ‘वेल-महावेल’ पुस्तकात ‘वतनवेल’ आणि ‘रामरखी’ ही दोनच नावं दिली आहेत. तमिळ भाषेत “कोट्टाय्यचाची”, मल्याळममध्ये “बट्टवल्ली”, कोंकणीत “वेटयेल” अशीही नावं आहेत. यावरून भारतात सर्वत्र तिचा पूर्वीपासून आढळ आहे हे स्पष्ट होतं. आशिया खंडातल्या परदेशी भाषांध्येही हिला आणखी नावं आहेत. आयुर्वेदात कुठे वाटणवेलीचा उल्लेख आढळत नाही अशी नोंद श्री. द. महाजन यांच्या पुस्तकात आहे. पश्चिम घाटातल्या घनदाट जंगलांत आणि आशिया खंडात सगळीकडे हिचा आढळ आहे. सह्याद्रीतल्या देवरायांमध्ये प्रचंड मोठ्या आढळतात.

 

संदर्भ – (https://indiabiodiversity.org/species/show/229564

छायाचित्र ठिकाण – वाकी व हुर्से वहाळ

Share Tweet Follow Share Email Share