वेळू 
 

गावात पूर्वी वेळूची बेटे विपुल प्रमाणात होती, मात्र मध्यंतरीच्या काळात काटा आल्यामुळे बरीचशी बेटे नष्ट झाली. सद्यस्थितीत वाकी, म्हैसासुर वाडी येथे वेळूची बेटे तुरळक प्रमाणात आढळतात. वेळू हा तीन ते चार इंचांपर्यंत जाड व ३० ते ४० फुटांपर्यंत उंच असतो. त्याला काटे असतात. वेळूच्या जाड केलांमुळे झाडावर चढण्यासाठी वा विहिरीत उतरण्यासाठी लोक त्याचा शिडीसारखा वापर करतात. वेळूचे वासेही चांगले होतात. वेळूमध्ये ‘कागदी’ आणि ‘लोखंडी’ असे दोन प्रकार असतात, असे स्थानिक लोक सांगतात. लोखंडी वेळू भरीव व जड असतो व तो इमारती बांधकामाला उपयोगी येतो, तर कागदी वेळू पोकळ व हलका असल्याने निकृष्ट दर्जाचा असतो अशी माहिती स्थानिक लोक सांगतात.

Share Tweet Follow Share Email Share