झुंबर (Bruguiera gymnorhiza)

झुंबर ही अणसुरे खाडीच्या कांदळवन पट्ट्यात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. लांब टोकदार गर्द हिरवे पान व गुलाबी रंगाचे छोटे फुल यावरून ही वनस्पती ओळखता येते. उंची जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत असते. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास या वनस्पतीला फुले येतात व मागोमाग शूट्स येतात. हे शूट्स खाली पडून चिखलात रुततात व त्यातून नवीन रोप रुजते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Burma%20Mangrove.html)
Share Tweet Follow Share Email Share