
धामण (Grewia Tiliaefolia) धामणीची मध्यम उंचीची (१० ते ३० मी) झाडे गावात डोंगरउतारावरील भागात तसेच सड्यांच्या अवतीभवती सामान्य प्रमाणात आढळतात. स्थानिक लोकांकडून काठ्या बनवण्यासाठी, तसेच दोर काढण्यासाठी धामणीच्या खोडाचा उपयोग केला जातो. उन्हाळाअखेर या वृक्षाला पांढऱ्या-पिवळ्या रंगाची बारीक फुले येतात व पावसाळ्यात बारीक टपोरी हिरवी फळे येतात. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) – मराठी विश्वकोश […]