Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Month: May 2022

सुरण

May 28, 2022
| No Comments
| वेलि

सुरण  (Amorphophallus aspera) सुरण ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. पावसाळ्यात सुरणाचे कंद रुजून येतात. लूत आणि सुरण यात बरेच साम्य दिसते, मात्र खोडाच्या पांढरेपणावरून सुरण ओळखता येतो. लोक आपल्या घराच्या आजूबाजूच्या जागेत, परसवात नैसर्गिकरित्या रुजून आलेल्या सुरणाची लागवड करतात. पुरेसा मोठा झाल्यावर सुरण खणून काढला जातो. २ किलो, ५ किलो वा त्यापेक्षा […]

Read More »

Posted in वेलि

वाटणवेल

May 24, 2022
| No Comments
| वेलि

वाटणवेल (Diploclisia glaucescens) वाटणवेल ही गावात आढळणारी एक दुर्मिळ वनस्पती आहे. वाकीचा वहाळ आणि हुर्से वहाळ या दोनच ठिकाणी ही वनस्पती आढळली आहे. या दोन्ही वहाळांमध्ये ही प्रचंड वाढलेली दिसते. वसंत ऋतूत हिला सोनेरी रंगाचा मोहोर येतो व त्यामागोमाग पांढऱ्या चपट्या फळांनी ही वेल लगडते. पाने हिरवी बदामाकृती मध्यम आकाराची असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी […]

Read More »

Posted in वेलि

भात

May 21, 2022
| No Comments
| शेती

Read More »

Posted in शेती

भोकर

May 20, 2022
| No Comments
| Tree

भोकर (Cordia dichotoma) भोकर हे गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारे झाड आहे. भोकराच्या झाडाला ‘भोकरीण’ असे म्हणतात. दांडे, हुर्से येथे हे झाड आढळून आले आहे. भोकरांचे लोणचे पूर्वी घालत असे स्थानिक लोक सांगतात. अलीकडे कोणी लोणचे करत नाही. भोकरांचा गर चिकट असतो व तो पूर्वी नैसर्गिक डिंक म्हणून वापरायचे. अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://vishwakosh.marathi.gov.in/28228/)

Read More »

Posted in Tree

किरकिरी

May 20, 2022
| No Comments
| mangroves

किरकिरी (Ceriops tagal) किरकिरी ही गावातील कांदळवन पट्ट्यात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. हिला ‘सोनचिप्पी’ असेही म्हणतात. दांडे, हुर्से, भराडे, वाकी येथील कांदळवनांमध्ये ही वनस्पती आढळून आली आहे. अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://en.wikipedia.org/wiki/Ceriops_tagal)

Read More »

Posted in mangroves

गुलमोहोर

May 20, 2022
| No Comments
| अस्थानिक

गुलमोहर गुलमोहोर हे गावात तुरळक प्रमाणात आढळणारे झाड आहे. अणसुरे आड भराडे शाळा येथे पूर्वी गुलमोहोराचा एक वृक्ष होता. आरेकरवाडी वाडी येथे गुलमोहोराचा साधारणतः ३० फूट उंचीचा वृक्ष आहे. उन्हाळ्यात हा वृक्ष तांबड्या फुलांनी बहरतो. बाकी गावात कुठे गुलमोहोराची झाडे विशेष आढळत नाहीत.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/22391/)

Read More »

Posted in अस्थानिक

घणसकांड

May 20, 2022
| No Comments
| वेलि

घणसकांड  घणसकांड ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. गावठाण भागात दोन-तीन ठिकाणी ही वेल पोफळीवर सोडलेली आढळते. या वेलीला घणसकांड हे नाव कशावरून पडले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. पाने अळवाच्या पानासारखी मोठी परंतु जाड असतात. या वनस्पतीचा औषधी उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

Read More »

Posted in वेलि

नीलांबी

May 20, 2022
| No Comments
| वेलि

नीलांबी (Phyllanthus reticulatus)     नीलांबी हे गावात तुरळक प्रमाणात आढळणारे झुडूप आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर गावठाण भागात हे झुडूप आढळून आले आहे. गावात या वनस्पतीला ‘भाणसपोय’, ‘पिडपिडी’ अशी नावे स्थानिक लोकांकडून कळतात. फळे बारीक जांभळी तुरट असतात. फळांत शाईसारखा द्रव असतो. पाने चिंचेच्या पानासारखी असतात. अधिक माहितीसाठी संदर्भ – https://en.wikipedia.org/wiki/Phyllanthus_reticulatus)

Read More »

Posted in वेलि

खैर

May 20, 2022
| No Comments
| Tree

खैर  खैराची लहान झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. वाकी-भराडे येथील डोंगरउतारांवर खैराची लहान उंचीची झाडे (५ ते १० फूट) आढळली आहेत. खैराची व्यावसायिक लागवड गावात नाही. धार्मिक कार्यात खैराच्या समिधा वापरल्या जातात. अधिक माहितीसाठी संदर्भ – मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/21134/) खैराच्या समिधा धार्मिक कार्यांमध्ये वापरल्या जातात.

Read More »

Posted in Tree

वसंत

May 19, 2022
| No Comments
| पक्षी

छायाचित्र – उन्मेष परांजपे स्थळ: लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ वसंत वसंत हा गावात सामान्य प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. रंग हिरवा व पंख काळसर असतात. मध्यम ते मोठ्या उंचीच्या झाडांवर हा आढळतो. बरेचदा हे पक्षी जोडीने ओरडताना आढळतात. या पक्ष्याचे ओरडणे मार्च ते मे या कालावधीत खास करून ऐकू येते. या पक्ष्याच्या ओरडण्याला गावात ‘टुकरूल घालणे’ असे म्हणतात. […]

Read More »

Posted in पक्षी

Posts navigation

1 2 … 7 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com