Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: Tree

वड

June 14, 2022
| No Comments
| Tree

वड (Ficus benghalensis) वडाची झाडे गावात सामान्य प्रमाणात आढळतात. वडाच्या एकूण ५८ महावृक्षांची (३ मीटरपेक्षा जास्त घेर असलेल्या) नोंद अणसुरे गावात झाली आहे. यामध्ये पंगेरेवाडी परिसरात ७, गावठाण भागात ८, शेवडीवाडी-आरेकरवाडी परिसरात २, दांडे-शेरीवाडी-बौद्धवाडी परिसरात २, गिरेश्वर मंदिर परिसरात २, आडीवाडीत ९, भराडेवाडी परिसरात ३, वाकी परिसरात १३ आणि म्हैसासुर-हुर्से परिसरात १२ महावटवृक्षांची नोंद […]

Read More »

Posted in Tree

भोकर

May 20, 2022
| No Comments
| Tree

भोकर (Cordia dichotoma) भोकर हे गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारे झाड आहे. भोकराच्या झाडाला ‘भोकरीण’ असे म्हणतात. दांडे, हुर्से येथे हे झाड आढळून आले आहे. भोकरांचे लोणचे पूर्वी घालत असे स्थानिक लोक सांगतात. अलीकडे कोणी लोणचे करत नाही. भोकरांचा गर चिकट असतो व तो पूर्वी नैसर्गिक डिंक म्हणून वापरायचे. अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://vishwakosh.marathi.gov.in/28228/)

Read More »

Posted in Tree

खैर

May 20, 2022
| No Comments
| Tree

खैर  खैराची लहान झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. वाकी-भराडे येथील डोंगरउतारांवर खैराची लहान उंचीची झाडे (५ ते १० फूट) आढळली आहेत. खैराची व्यावसायिक लागवड गावात नाही. धार्मिक कार्यात खैराच्या समिधा वापरल्या जातात. अधिक माहितीसाठी संदर्भ – मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/21134/) खैराच्या समिधा धार्मिक कार्यांमध्ये वापरल्या जातात.

Read More »

Posted in Tree

उंडल

May 12, 2022
| No Comments
| Tree

उंडल (Calophyllum inophyllum)     उंडल/उंडिल हे गावात खाडीकिनाऱ्याच्या परिसरात सामान्य प्रमाणात आढळणारे झाड आहे. दांडे-पंगेरे परिसरात उंडिलाच्या मध्यम उंचीच्या (१० ते २० फूट) ५० पेक्षा जास्त झाडांची नोंद झाली आहे. काळेकुट्ट खोड, गडद हिरवी पाने, सुरंगीसारखी पांढरी सुगंधी फुले व हिरवी गोल फळे यावरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. उंडिलाच्या झाडाला लोकजीवनात खूप महत्त्व आहे. […]

Read More »

Posted in Tree

मोगली एरंड

May 9, 2022
| No Comments
| Tree

मोगली एरंड (Jatropha curcas)     मोगली एरंडाची ५ ते ८ फूट उंचीची खुरटी झुडुपे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. गावात शेताला, बागेला वय (कुंपण) करण्यासाठी याचा वापर होतो. या झाडाला चीक असतो. याच्या पानांच्या देठांतून साबणासारखे बुडबुडे येतात. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ […]

Read More »

Posted in Tree

बोर्याटीण

April 18, 2022
| No Comments
| Tree

बोर्याटीण (……………..) बोर्याटीणीची लहान उंचीची झाडे (५ ते १५ फूट) गावात तुरळक प्रमाणात आढळतात. बोराचेच भाईबंद असलेले हे झाड आहे. वाकीच्या सड्यावर बोर्याटीणीच्या झाडांची नोंद झाली आहे. पाने लहान गोलाकार असून फांद्या काटेरी असतात. याला बोरासारखी काळी फळे येतात. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. जळवणासाठी लोक कवळ तोडतात.

Read More »

Posted in Tree

बोखाडा

April 18, 2022
| No Comments
| Tree

बोखाडा (Casearia graveolens )   बोखाडा हे झाड गावात अत्यंत दुर्मिळ आहे. वाकी वाडीत बोखाड्याच्या लहान उंचीच्या (५ ते १० फूट) दोन झाडांची नोंद झाली आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या जांभळाच्या आकाराच्या हिरव्या-पिवळ्या फळांवरून हे झाड ओळखता येते. फळे तडकतात व लाल बी बाहेर दिसते. पक्षी फळे खातात. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास […]

Read More »

Posted in Tree

कौशी

April 18, 2022
| No Comments
| Tree

कौशी (Firmiana colorata)   कौशीची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते २० फूट) गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. गिरेश्वर मंदिराच्या आसपासच्या सड्यावर व वाकी-भराड्याच्या सड्यावर कौशीची झाडे आहेत. मार्च-एप्रिलमध्ये येणाऱ्या लालेलाल फुलांनी हे झाड सहज ओळखू येते. त्यानंतर गुलाबी रंगाच्या शेंगांनी हे झाड लगडते. कौशीची फळे आंबटसर असतात व ती खाद्य […]

Read More »

Posted in Tree

बेहडा

April 6, 2022
| No Comments
| Tree

बेहडा (Terminalia bellirica) बेहड्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते ३० फूट) गावात सामान्य प्रमाणात आढळतात. म्हैसासुरवाडी, वाकी-भराडे या भागात बेहड्याची झाडे विशेष करून आढळतात. बेहड्याच्या एका महावृक्षाची नोंद गावात झाली आहे. उन्हाळ्यात बेहड्याला फळे येतात. स्थानिक भाषेत बेहाड्यांना ‘हेळे’ म्हणतात. बेहड्याचा आयुर्वेदिक उपयोग खूप आहे, मात्र गावात औषधासाठी, खाद्य म्हणून वा अन्य कोणत्या […]

Read More »

Posted in Tree

बिवळा

April 6, 2022
| No Comments
| Tree

बिवळा (Pterocarpus marsupium)   बिवळ्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते ३० फूट) गावात सामान्य प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. बिवळ्याला ‘पालेआसन’ असेही नाव आहे. इमारती बांधकामासाठी बिवळ्याची झाडे तोडली जातात. बिवळ्याचे लाकूड कठीण व आतून लालसर असते. पाने बारीक, बकुळीच्या पानांसारखी असतात. उन्हाळ्यात बिवळे हिरवट-गुलाबी-नारिंगी अशा मिश्र रंगाने मोहोरतात. सोबतचे चित्र हे […]

Read More »

Posted in Tree

Posts navigation

1 2 … 6 Next

Archives

• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com