नीलभोवर

नीलभोवर (Ipomoea purpurea) नीलभोवर ही अणसुरे गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. तलाठी कार्यालयासमोर, कणेरीवाडी घाटीजवळ, अशा काही तुरळक ठिकाणी ही वनस्पती आढळून आली आहे. ‘भोवर’ (Ipomoea) प्रजातीताल्या तीन-चार जाती गावात आढळल्या आहेत. सकाळच्या वेळी फुललेल्या निळ्या रंगाच्या सुंदर धोतऱ्यासारख्या लहान आकाराच्या फुलांवरून ही वनस्पती सहज ओळखता येते. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा या वनस्पतीच्या फुलण्याचा […]