Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Month: November 2021

पराडा

November 13, 2021
| No Comments
| Fish

पराडा परांडा हा खाडीत नेहमी भरपूर प्रमाणात आढळणारा मासा आहे. जाळ्यात हा मासा जास्त प्रमाणात मिळतो. लहान माशाची लांबी दोन ते ३ इंच, तर मोठ्या माशाची लांबी ५ ते ६ इंच असते. लहान माशाचे वजन ५० ग्रॅम, तर मोठ्या माशाचे वजन साधारणपणे पाऊण किलोपर्यंत भरते. तळून वा रस्सा करून हा मासा खाल्ला जातो. याला बाजारात कमी, […]

Read More »

Posted in Fish

तांबोशी

November 13, 2021
| No Comments
| Fish

तांबोशी (Lutjanus argentimaculatus) तांबोशी हा अणसुरे खाडीत विपुल प्रमाणात आढळणारा मासा आहे. छोटे व मोठे असे दोन्ही प्रकारचे तांबोशी मासे खाडीत आढळतात. पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या तांबोशी माशाची लांबी २ ते ३ फूट असते. रंग लालसर असतो. वजन साडेतीन ते चार किलो असते. वर्षभर हा माझा खाडीत मिळतो, परंतु पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळतो. सावेला टोकाशी जिवंत मासा […]

Read More »

Posted in Fish

पालू

November 13, 2021
| No Comments
| Fish

पालूपालू हा खाडीत भरपूर मिळणारा मासा आहे. पूर्वीच्या तुलनेत अलीकडे याचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाळ्यात तुलनेने जास्त प्रमाणात मिळतो. लहान माशांना टिकरी म्हणतात. पूर्व वाढ झालेल्या माशाची लांबी ९-१० इंचांपर्यंत असते. वजन २ किलोपर्यंत भरते. बाजारभाव १५० ते २०० रुपयांपर्यंत आहे.

Read More »

Posted in Fish

वागळी

November 13, 2021
| No Comments
| Fish

वागळी वागळी हा खाडीत किरकोळपणे आढळणारा मासा आहे. गराने वा जाळ्याने हा मासा पकडला जातो. वागळीचे ‘भाटवागळी’, ‘बोलाड’, ‘पालवी’ असे मुख्यतः तीन प्रकार आहेत. चित्रात दाखवलेली वागळी ही भाटवागळी आहे. आकार गोलसर चौकोनी असतो. या माशाची लांबी-रुंदी ५ फुटापर्यंत, तर गोलाई १५ ते १७ फुटांपर्यंत असते. पंगेरे खाडी येथे सुमारे ५० ते ६० किलोंपर्यंतचे मासे […]

Read More »

Posted in Fish

सुरंगी

November 11, 2021
| No Comments
| Tree

सुरंगी (Mammea suriga)सुरंगीची मध्यम उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आहेत. मोठे वृक्ष पूर्वी गावात होते असे अनुभवी लोक सांगतात. आडीवाडी, लक्ष्मीनारायण मंदिर, भावकाई मंदिर या परिसरात सुरंगीची एक-दोन मोठी झाडं आहेत. गर्द हिरवी पाने असणाऱ्या या झाडाला फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास पांढरी अत्यंत सुगंधित फुले येतात. मधमाशांसाठी सुरंगीची झाडं अत्यंत महत्त्वाची आहेत. सुरंगीत नर आणि मादी असे […]

Read More »

Posted in Tree

पिंपळ

November 11, 2021
| No Comments
| Tree

पिंपळ (Ficus religiosa)पिंपळाचे मोठे वृक्ष गावात सामान्य प्रमाणात आहेत. गिरेश्वर मंदिराच्या पाठीमागील पिंपळाचा महावृक्ष समोरील विजयदुर्ग किल्ल्यावरूनही दृष्टीस पडतो. मारुतीच्या देवळाच्या पारावर दोन पिंपळाची छोटी झाडे आहेत. पक्ष्यांच्या विष्ठेतून पिंपळाच्या बियांचा प्रसार होतो व पावसाळ्यात विशेषतः दगडांच्या सानिध्यात त्याची रोपे रुजून येतात. पिंपळाचे झाड सहसा कोणाकडून तोडले जात नाही. पिंपळाचे लाकूड हलके व बांधकामास निरुपयोगी […]

Read More »

Posted in Tree

मोवई

November 11, 2021
| No Comments
| Tree

मोवई (Lannea coromandelica)  मोवईची लहान ते माध्यम उंचीची झाडे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. खोड करड्या रंगाचे असते. पाने लहान, हिरवी व दुतर्फा एकमेकांना समांतर स्वरूपात असतात. उन्हाळ्यात मोवईच्या झाडांना पांढरा मोहोर येतो व त्यामागोमाग तोरणासारखी शेंगदाण्याच्या आकाराएवढी काळपट पांढरी फळे येतात. मोवईची फळे हे अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. फुले-फळे […]

Read More »

Posted in Tree

कुंभा

November 11, 2021
| No Comments
| Tree

कुंभा (Careya arborea) कुंभ्याची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. जळवणासाठी व भाजावळीसाठी कुंभ्याचे कवळ (बारक्या फांद्या) तोडले जातात. घराचे वासे वा फळ्या पाडण्यासाठी कुंभ्याचे लाकूड वापरतात. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास कुंभ्याच्या झाडाला पांढरी मोठी भरपूर केसरे असलेली फुले येतात. फळे हिरवी मोठी असतात. पान मोठे लंबवर्तुळाकार असते. […]

Read More »

Posted in Tree

कुडा

November 11, 2021
| No Comments
| Tree

कुडा (Holarrhena pubescens)  कुड्याची लहान आकाराची झाडे गावात विशेषतः कातळसड्यांच्या आजूबाजूच्या झुडुपांमध्ये तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. खोड बारीक व राखाडी रंगाचे असते. उन्हाळ्यात कुड्याच्या झाडांना पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले गुच्छाने येतात. पावसाळ्यात शेंगा येतात. कुड्याच्या फुलांची व शेंगांची क्वचित काही ठिकाणी भाजी केली जाते.मानवी आरोग्यासाठी कुडा ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. कुड्याचे […]

Read More »

Posted in Tree

खुरई

November 11, 2021
| No Comments
| Tree

खुरई (Ixora brachiata)  खुरईचे लहान ते मध्यम आकाराचे वृक्ष गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. पाने मध्यम आकाराची गर्द हिरवी असतात. खोड काळे असते. डिसेंबर-जानेवारीमध्ये खुरईच्या झाडांना पांढरा मोहोर येतो व त्यानंतर बारीक तिरफळासारखी हिरवी फळे येतात. फुलांचा घमघमाट वातावरणात पसरतो. खुरईचा औषधी वा अन्य उपयोग गावात ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – […]

Read More »

Posted in Tree

Posts navigation

1 2 3 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com