Month: August 2021
कांदळवन प्रजाती/सहप्रजाती
अणसुरे गाव हे उत्तर आणि दक्षिण दिशांनी पूर्णपणे खाडीने वेढलेले आहे. सुमारे ५ ते ६ किलोमीटर लांबीची खाडी दोन्ही बाजूला आहे. या खाडीकिनाऱ्याने अतिशय समृद्ध असा कांदळवनांचा पट्टा आहे. कोकणात आढळणाऱ्या जवळजवळ सर्व प्रकारच्या कांदळवन प्रजाती आणि सहप्रजाती या पट्ट्यात आढळतात. कांदळवनांचे क्षेत्र हे सुमारे १२९ हेक्टर आहे.
गुलाबी कर्णफूल

गुलाबी कर्णफूल (Crinum latifolium) गुलाबी कर्णफूल ही वनस्पती पावसाळ्याच्या सुरुवातीला रुजून येते. जास्तीत जास्त एक ते दीड फूट उंच वाढते. पांढऱ्याशुभ्र मोठ्या फुलांमुळे आकर्षक दिसते. अणसुरे गावात हुर्से, वाकी इथल्या सड्यांवर, जांभुळकाठ्यात ही वनस्पती तुरळक प्रमाणात आढळते. ही वनस्पती लिलीच्या वर्गातील आहे. मराठीत ‘गडांबी कांदा’ असेही नाव आहे. संस्कृतमध्ये ‘चक्रांगी’, ‘मधुपर्णीका’, ‘सुदर्शन’, ‘वृषकर्णी’, अशी […]