काळी मुसळी

काळी मुसळी (Curculigo orchioides) काळी मुसळी ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. पावसाळ्यातले काही दिवस दगडांच्या फटीतून ही रुजून आलेली दिसते. गावातील गिरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ही आढळून आली आहे. कांद्याच्या पात्यांसारखी जमिनीलगत असणारी पाने आणि बारीक पिवळी फुले यावरून ही वनस्पती ओळखता येते. या वनस्पतीचा अणसुरे गावात औषध म्हणून फारसा वापर अलीकडे होत […]