Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
  • मुखपृष्ठ
  • अणसुरे विषयी
  • जैवविविधता प्रकार
    • जंगली झाडे
    • वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
    • कांदळवन प्रजाती
    • प्राणी
    • पक्षी
    • मासे
    • बांबू प्रजाती
    • शेती पिके
    • अळंबी प्रजाती
    • बागायती पिके
    • परसबाग वनस्पती
    • अस्थानिक वनस्पती
  • विशेष नोंदी
  • फोटो गॅलरी
  • अभिप्राय

दांडे-पंगेरे समुद्रकिनारा

dande-beach
दांडे-पंगेरे समुद्रकिनारा हे अणसुरे गावातील एक नयनरम्य ठिकाण आहे. गावाची संपूर्ण पश्चिम हद्द ही समुद्रकिनाऱ्याने वेढलेली आहे. येथून समोर सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेला विजयदुर्ग किल्ला दिसतो. पूर्वी पंगेऱ्यातून विजयदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी ‘छबिना’, म्हणजेच इंजिनची होडी असायची, परंतु आता सागरी महामार्ग झाल्यामुळे हे छबिने बंद झाले आहेत. समुद्रकिनाऱ्याची लांबी सुमारे ९०० मीटर आहे, तर रुंदी (पुळणीचा भाग) सुमारे ३०० मीटरपर्यंत आहे. त्यापुढे खोल समुद्र सुरु होतो.

किनाऱ्यावरची वाळू काळपट राखाडी रंगाची आहे. सागरी महामार्गाच्या गावाकडील बाजूला उंडिलाची झाडे आढळतात, तर किनाऱ्याकडील बाजूला सुरुच्या झाडांची लागवड अलीकडे झाली आहे. ‘मर्यादवेल’ (Ipomoea pes-caprae) ही किनाऱ्याची धूप रोखणारी कोकणातली अत्यंत महत्त्वाची वनस्पती या ठिकाणी भरपूर प्रमाणात पसरलेली आढळते. याशिवाय ‘खुळखुळा’ (Crotalaria verrucosa) हे झुडुपही वाळूलगत मोठ्या प्रमाणावर आढळते.

Crotalaria

खुळखुळा (Crotalaria verrucosa)

छोट्या खेकड्यांनी वाळूत पडलेली भोके

खेकडा

दांडे-पंगेरे समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. अणसुरे गावातील, तसेच आजूबाजूच्या गावांमधील अनेक लोक संध्याकाळच्या वेळी विरंगुळा व मजेसाठी समुद्रकिनाऱ्यावर येतात. पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतात. लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या अस्ताव्यस्त टाकू नयेत यासाठी प्लास्टिक संकलकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरुची लागवड

सुरुबनात बसण्यासाठी केलेली बाकडी

प्लास्टिक बाटल्या संकलक

Share Tweet Follow Send Share Email Share

Archives

  • November 2022
  • October 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • November 2021
  • September 2021
  • August 2021
  • June 2021

Meta

  • Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com