१. भावकाई
अणसुऱ्याच्या गावठाण भागात कणेरी-वाडेकर वाडीजवळ भावकाईचे एक छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या सुमारे १८ गुंठे परिसरात एक राई आहे. पिंपळ आणि पायरीचे दोन महावृक्ष येथे आहेत. सळसळ्याचा (शिरीष) एक मोठा वृक्ष आहे. सुरंगीची लहान, मध्यम व मोठ्या आकाराची एकूण १७ झाडे येथे आहेत. याशिवाय वड, आष्टा, काजरा, बकुळ, खुरई, किंजळ, धामण, मोवई, कुंभा, चिंच यांची मध्यम आकाराची झाडे येथे आहेत. देवस्कीसाठी, कौल लावण्यासाठी लोक येथे येतात. बाकी कोणता सण-उत्सव येथे होत नाही.

२. म्हैसासूर

म्हैसासूर वाडी येथील हा वटवृक्ष वाडीचा देव म्हणून मानला जातो. या देवस्थानच्या आजूबाजूला सुरंगीची छोटी झाडे आणि वेळूची बेटे आहेत.

२. म्हैसासूर
म्हैसासूर वाडी येथील हा वटवृक्ष वाडीचा देव म्हणून मानला जातो. या देवस्थानच्या आजूबाजूला सुरंगीची छोटी झाडे आणि वेळूची बेटे आहेत.३. ठिकाणबंदी महापुरुष – भराडे
भराडेवाडी येथे एक पिंपळाचा महावृक्ष आहे. याला ‘ठिकाणबंदी महापुरुष’, किंवा ‘ब्राह्मणदेव’ असं म्हणतात. या पिंपळाच्या वृक्षाच्या बाजूला ‘वारस’ (Heterophragma quadriculata) हा एक दुर्मिळ वृक्ष आहे. कार्यप्रसंगी या महापुरुषाला नारळ ठेवला जातो.
३. ठिकाणबंदी महापुरुष – भराडे
भराडेवाडी येथे एक पिंपळाचा महावृक्ष आहे. याला ‘ठिकाणबंदी महापुरुष’, किंवा ‘ब्राह्मणदेव’ असं म्हणतात. या पिंपळाच्या वृक्षाच्या बाजूला ‘वारस’ (Heterophragma quadriculata) हा एक दुर्मिळ वृक्ष आहे. कार्यप्रसंगी या महापुरुषाला नारळ ठेवला जातो.
४. भराडीण देवी

भराडे येथील हे जुने देवस्थान आहे. येथे छोटे मंदिर आहे. मंदिराजवळ बकुळीचा एक मोठा वृक्ष आहे. मोवईचे एक मोठे झाड आहे. बिवळ्याची मध्यम उंचीची झाडे आहेत. या मंदिराच्या बाजूने वाकी-भराड्याचा वहाळ जातो. आजूबाजूला झुडुपी जंगल आहे.

४. भराडीण देवी
भराडे येथील हे जुने देवस्थान आहे. येथे छोटे मंदिर आहे. मंदिराजवळ बकुळीचा एक मोठा वृक्ष आहे. मोवईचे एक मोठे झाड आहे. बिवळ्याची मध्यम उंचीची झाडे आहेत. या मंदिराच्या बाजूने वाकी-भराड्याचा वहाळ जातो. आजूबाजूला झुडुपी जंगल आहे.५. निरंकारी

हुर्से वाडी येथील हे प्रमुख देवस्थान आहे. येथे नव्याने बांधकाम झालेले छोटे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला बकुळीचा मोठा वृक्ष आहे. आजूबाजूला घनदाट जंगल आहे. बाजूने वहाळ जातो. या वहाळाच्या कडेने अनेक मोठे वृक्ष व महावेली आहेत
५. निरंकारी
हुर्से वाडी येथील हे प्रमुख देवस्थान आहे. येथे नव्याने बांधकाम झालेले छोटे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला बकुळीचा मोठा वृक्ष आहे. आजूबाजूला घनदाट जंगल आहे. बाजूने वहाळ जातो. या वहाळाच्या कडेने अनेक मोठे वृक्ष व महावेली आहेत.
६. महापुरुष – खालची वाकी

खालच्या वाकीतील या ठिकाणी दोन मोठे पार बांधलेले वटवृक्ष आहेत. त्यात मध्ये चिव्याच्या बांबूचे बेट आहे. येथे सणावारांना नैवेद्य ठेवला जातो.