भात

तूर तूर हे गावात भातपिकाच्या जोडीने घेतले जाणारे पीक आहे. भातमळ्यांच्या कडेने लोक तुरीची लागवड करतात. तुरीची व्यावसायिक तत्त्वावर लागवड केली जात नाही, तर घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यापुरती लागवड केली जाते. गावातल्या गावात काही प्रमाणात खरेदी-विक्री होते. तुरीचे गावठी बियाणेच वापरले जाते. गावात पिकणाऱ्या तुरीची उंची ७ ते ८ फुटांपर्यंत असते. तुरीची उसळ, तूरडाळीची आमटी […]
नाचणा नाचणा हे गावात अल्प प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. भातशेतीमध्ये मिश्र पीक म्हणून नाचण्याचे काही मळ्यांमध्ये नाचण्याचे पीक घेतले जाते. भातशेतीच्या मळ्यात मध्ये मध्ये नाचण्याची टोवणी केली जाते. नाचण्याची शेती व्यावसायिक तत्त्वावर केली जात नाही, तर घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी केली जाते. यामध्ये नाचण्याचे गावठी बियाणेच वापरले जाते. नाचण्याची भाकरी हा गावातल्या लोकांच्या आहाराचा […]
कुळीथ कुळीथ हे गावात अल्प प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. आखेऱ्याचा मळा, दांडे, म्हैसासूर वाडी येथे अल्प प्रमाणात कुळीथ पिकतो. कुळीथ हा गावातील लोकांच्या आहारातला एक मुख्य घटक आहे. कुळथाचे पिठले हे गावातील लोकांचे आवडते खाद्य आहे. गावात काही मळ्यांमध्ये नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दोनदा कुळीथाचे पीक घेतले जाते. कुळीथ तयार झाल्यावर तो उपळून […]
उडीद उडीद हे गावात अत्यल्प प्रमाणात पिकवले जाणारे कडधान्य आहे. आखेऱ्याचा मळा, दांडे येथे इतर कडधान्य पिकांबरोबर अत्यल्प प्रमाणात उडीद पिकवला जातो. हे पीक गावात व्यावसायिक तत्त्वावर घेतले जात नसून घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी घेतले जाते. उडदाचे गावठी बियाणेच वापरले जाते.
चवळी चवळी हे गावात अल्प प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. आखेरे येथे पावसाळ्यानंतर केल्या जाणाऱ्या गिमवसात कुळीथाबरोबर चवळीचे मिश्र पीक घेतले जाते. मोठी पांढरी चवळी आणि बारीक लाल चवळी अशा चवळीच्या दोन गावठी जाती गावात पिकवल्या जातात. चवळीचे व्यावसायिक उत्पादन गावात घेतले जात नसून घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी घेतले जाते. चवळीच्या ओल्या शेंगा आवडीने […]
कडवा कडवा हे अणसुरे गावात अत्यंत कमी प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. पूर्वी गावात कडवा जास्त प्रमाणात पिकायचा असे स्थानिक लोक सांगतात. अलीकडे फक्त आखेऱ्यातील मळ्यात पावसाळ्यानंतरच्या गिमवसात अत्यल्प प्रमाणात कडवा पिकवला जातो. कडव्याचे गावात व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन घेतले जात नाही. घरातली अन्नाची गरज भागवण्यापुरतेच उत्पादन घेतले जाते.