Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: वेलवर्गीय/झुडूपी वनस्पती

तोरण

January 13, 2022
| No Comments
| वेलि

तोरण (Ziziphus rugosa)  तोरण हे गावात सड्यांच्या भागात सामान्य प्रमाणात आढळणारे काटेरी झुडूप आहे. एप्रिल-मे च्या सुमारास या झुडुपाला पांढरी टपोरी फळे येतात त्यांना ‘तोरणं’ म्हणतात. तोरणं हे माणसांचे, तसेच प्राणी-पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. चवीला किंचित तुरट असतात. काटेरी तोरणाची झाळी कुंपणासाठीही उपयोगी पडते.     अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (http://nopr.niscair.res.in/bitstream/123456789/13801/1/IJNPR%203%281%29%2020-27.pdf)   2) फ्लॉवर्स […]

Read More »

Posted in वेलि

तेरं अळू

January 13, 2022
| No Comments
| वेलि

तेरं अळू (Colocasia sp)  तेरं अळू ही पावसाळ्यात गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. तेरं अळू अत्यंत पौष्टिक असते. पावसाळ्यात गावातल्या बहुतांश लोकांकडून हे भाजीसाठी वापरले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला रुजून आलेली तेऱ्या अळवाची पाने गुरे खातात मात्र नंतर मोठी झाल्यावर दुर्लक्ष करतात. तेऱ्या अळवाला खाज असते त्यामुळे अळू सोलून झाल्यावर आमसूल लावून हात धुतात. […]

Read More »

Posted in वेलि

तुतारी

January 13, 2022
| No Comments
| वेलि

तुतारी (Rhamphicarpa scaposa)  पावसाळ्यात साधरणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात कातळसड्यांवर आढळणारे हे रानफुल आहे. गिरेश्वरच्या मंदिराच्या मागच्या सड्यावर हे फुल मोठ्या प्रमाणात दिसते. अन्यत्र तुरळक प्रमाणात आढळते. याचा आकार तुतारीसारखा वक्र असल्याने याला तुतारी असे नाव पडले आहे. रंग पूर्ण पांढरा असतो व लांबी जेमतेम बोटभर असते. जमिनीलगत उगवते. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) फ्लॉवर्स ऑफ इंडिया […]

Read More »

Posted in वेलि

टाकळा

January 13, 2022
| No Comments
| वेलि

टाकळा (Cassia tora)  टाकळा ही पावसाळ्यात रस्त्याकडेला, तसेच गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. जून झालेला टाकळा खाण्यास निरुपयोगी. टाकळा एक ते दीड फूट उंच वाढतो. टाकळ्याची भाजी पोटाला चांगली असते. पावसाळा अखेर टाकळ्याला पिवळी बारीक फुले येतात व शेंगा धरतात. गुरे टाकळा खात नाहीत.   अधिक माहितीसाठी […]

Read More »

Posted in वेलि

चिलार

January 13, 2022
| No Comments
| वेलि

चिलार (Caesalpinia crista)   गावात ही वनस्पती ‘वाघाटी’ या नावानेही ओळखली जाते. पंगेरे खाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने ही वनस्पती विपुल प्रमाणात आढळते. पाने छोटी गर्द हिरवी कढीपत्त्यासारखी असतात. फळे चपटी असतात. फांद्यांना काटे असतात. वर्षातून दोनदा ही वनस्पती पिवळ्या फुलांच्या घोसांनी बहरते. अनेक कीटक, मधमाश्या या फुलांवर दिसतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कोणता उपयोग […]

Read More »

Posted in वेलि

रुई

January 13, 2022
| No Comments
| वेलि

रुई (Calotropis gigantea)  रुईची लहान झुडुपे (३ ते ६ फूट) गावात विशेषतः खाडीकिनाऱ्याच्या परिसरात सामान्य प्रमाणात आढळतात. पाने मोठी, निळसर हिरवी असतात. २१ गणेशपत्रींमध्ये रुईच्या पानाचा समावेश आहे. रुईच्या पानांना चीक असतो. रुईच्या शेंगा तडकून त्यातून बीजप्रसार होतो. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Calotropis_gigantea) रुईच्या समिधा धार्मिक कार्यात वापरल्या जातात.

Read More »

Posted in वेलि

रानहळद

January 13, 2022
| No Comments
| वेलि

रानहळद  (Curcuma aromatica)  रानहळद ही पावसाळ्यात उगवणारी एक अत्यंत औषधी वनस्पती आहे. पावसाळा सुरु होण्याच्या सुमारास जमिनीतील कंदाला अंकुर फुटून रानहळदीची जांभळट गुलाबी रंगाची फुले जमिनीलगत रुजून येतात व त्यापाठोपाठ पाने फुटतात. डोंगरउतारावरील भागात, आगरांमध्ये ही वनस्पती खास करून आढळते. ही वनस्पती साधारणतः १ ते २ फूट उंच वाढते. रानहळदीची हळकुंडांसारखी मुळे औषधी आहेत.  गुरे […]

Read More »

Posted in वेलि

निळी पापणी

January 13, 2022
| No Comments
| वेलि

निळी पापणी (Utricularia sp)  निळी पापणी हे पावसाळ्यात कातळसाड्यांवर आढळणारे रानफुल आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान ही फुले उगवतात. गावात विशेषतः वाकी-भराडे येथील सड्यांवर या फुलाचा आढळ दिसतो. या फुलाला ‘सीतेची आसवं’ असंही म्हणतात. पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असलेले हे एक महत्त्वाचे रानफुल आहे. ही वनस्पती कीटकभक्षी आहे. ही फुले जमिनीलगत उगवतात व उंची जेमतेम वीतभर […]

Read More »

Posted in वेलि

गुळवेल

January 13, 2022
| No Comments
| वेलि

गुळवेल (Tinospora cordifolia)  अत्यंत औषधी असणारी ही वनस्पती गावात जिथे जंगलभाग टिकून आहे अशा ठिकाणी आढळते. उंच झाडांच्या आधाराने ही वेल वाढते. पाने मध्यम आकाराची , त्रिकोणी व टोकाकडे निमुळती असतात. फळे दाणेदार तांबडी असतात. पावसाळ्यात नवीन वेली भरपूर फुटतात. आयुर्वेदात गुळवेलीचे विविध औषधी उपयोग सांगितले आहेत. गावात काही लोक या वनस्पतीला ‘गरुडवेल’ या नावानेही […]

Read More »

Posted in वेलि

गोकर्ण

January 13, 2022
| No Comments
| वेलि

गोकर्ण (Clitoria ternatea))   गोकर्णीची झुडुपे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. धार्मिक कार्यांमध्ये गोकर्णीची फुले वापरली जातात. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास गोकर्णीला निळी फुले येतात. पांढरी गोकर्णही गावात क्वचित आढळते. गोकर्णीचा खाद्य, औषधी वा अन्य व्यावसायिक उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Clitoria_ternatea)

Read More »

Posted in वेलि

Posts navigation

Previous 1 … 5 6 7 … 9 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com