(murdannia spirata) पावसाळ्यात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती. उंची जेमतेम दोन ते तीन इंच. तीन पाकळ्यांचे निळे फूल. खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.
Month: May 2022
कचरा
कचरा कचरा ही वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. रानहळद आणि कचऱ्याची पाने अगदी तंतोतंत दिसत असल्यामुळे दोघांमधील फरक ओळखणे कठीण जाते. कचऱ्याला रानहळदीसारखे फुल नसते. उंची साधारणतः दोन-अडीच फुटांपर्यंत असते. गावात पूर्वी कचऱ्याचे सत्व काढले जाई व ते औषधी होते. अलीकडे मात्र कचऱ्याचे सत्व कोणी काढत नाही.
जंगली सुरण
जंगली सुरण (————–
नीलकंठ
नीलकंठ (Asystasia dalzelliana) नीलकंठ ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. छायाचित्रातील फोटो हा हेमंत वाडेकर यांच्या दुकानाजवळ काढलेला आहे. पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या सुमारास या वनस्पतीला कोरांटीसारखी लहान निळी फुले आलेली दिसतात. या वनस्पतीची उंची जेमतेम दोन फुटांपर्यंत असते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी […]
ढाल तेरडा
ढाल तेरडा (Impatiens pulcherrima) ढाल तेरडा ही पावसाळ्यात गावात सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालयापासून शेवडीवाडीपर्यंत रस्त्याच्या कडेने साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात ढाल तेरडा भरपूर फुललेला दिसतो. या वनस्पतीची उंची तीन ते चार फुटांपर्यंत असते. फुले सदाफुलीसारखी गुलाबी रंगाची असतात. फुलाचा आकार ढालीसारखा असतो म्हणून याला ‘ढाल तेरडा’ म्हणतात. ही वनस्पती […]
पाणलवंग
पाणलवंग (Ludwigia octovalvis) पाणलवंग ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी पाणवनस्पती आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी, बागांमध्ये, शेतमळ्यांमध्ये ही आढळून येते. पावसाळ्यात ही जास्त प्रमाणात दिसते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त १ फुटापर्यंत असते. चार पाकळ्यांच्या बारीक पिवळ्या फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी […]
लाजवंती
लाजवंती (Biophytum sensitivum) लाजवंती ही गावात पावसाळा अखेरीस तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती जमिनीलगत ४ ते ५ इंचापर्यंत वाढते. पानांची रचना आवळा-चिंचेच्या पानांसारखी असते. पावसाळा अखेरीस या वनस्पतीला पिवळी-बारीक फुले येतात. गुरे चरताना ही वनस्पती बरेचदा त्यांच्याकडून खाल्ली जाते वा पायाखाली तुडवली जाते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात […]
सांजवेल
सांजवेल (Rivea hypocrateriformis) सांजवेल ही गावात पावसाळ्यात सामान्य सडे व डोंगरउताराच्या भागात सामान्यपणे आढळणारी वनस्पती आहे. मारुतीच्या देवळापासून खाली उतरणाऱ्या डोंगरावर ही दरवर्षी हमखास आढळून येते. ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास हिला पांढरी धोत्र्यासारखी, परंतु लहान फुले येतात. पाने बदामाकृती, मध्यम आकाराची असतात. फुले सकाळी व संध्याकाळी उमलतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास […]
रानमेथी
रानमेथी (Desmodium triflorum) रानमेथी ही गावात पावसाळ्यात रुजून येणारी, तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती अगदी जमिनीलगत, जेमतेम अर्धा इंचच वाढते. गर्द हिरव्या गोल बारीक पानांवरुन ही सहज ओळखता येते. गुरे ही वनस्पती खातात. पावसाळा अखेरीस हिला जांभळट गुलाबी रंगाची फुले येतात व जमिनीलगत फुलांचा गालिचा सुंदर दिसतो. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा […]
काक गांजा
काक गांजा (Tadehagi triquetrum) काक गांजा ही पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसांत गावांत अत्यंत तुरळक प्रमाणात आढळलेली वनस्पती आहे. बागा, पाणवठ्याच्या जागा येथे ही वनस्पती आढळून आली आहे. बागेतले उपद्रवी तण म्हणून लोक याकडे बघतात. पान माध्यम आकाराचे असून तुळशीच्या मंजिरीसारखी गुलाबी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक […]