Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: वेलवर्गीय/झुडूपी वनस्पती

घणसकांड

May 20, 2022
| No Comments
| वेलि

घणसकांड  घणसकांड ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. गावठाण भागात दोन-तीन ठिकाणी ही वेल पोफळीवर सोडलेली आढळते. या वेलीला घणसकांड हे नाव कशावरून पडले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. पाने अळवाच्या पानासारखी मोठी परंतु जाड असतात. या वनस्पतीचा औषधी उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

Read More »

Posted in वेलि

नीलांबी

May 20, 2022
| No Comments
| वेलि

नीलांबी (Phyllanthus reticulatus)     नीलांबी हे गावात तुरळक प्रमाणात आढळणारे झुडूप आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर गावठाण भागात हे झुडूप आढळून आले आहे. गावात या वनस्पतीला ‘भाणसपोय’, ‘पिडपिडी’ अशी नावे स्थानिक लोकांकडून कळतात. फळे बारीक जांभळी तुरट असतात. फळांत शाईसारखा द्रव असतो. पाने चिंचेच्या पानासारखी असतात. अधिक माहितीसाठी संदर्भ – https://en.wikipedia.org/wiki/Phyllanthus_reticulatus)

Read More »

Posted in वेलि

चिमीन

May 9, 2022
| No Comments
| वेलि

चिमीन (Thunbergia laevis)     ही वेलवर्गीय वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ –  https://en.wikipedia.org/wiki/Thunbergia_fragrans)

Read More »

Posted in वेलि

बुरंबुळा

May 9, 2022
| No Comments
| वेलि

बुरंबुळा (Vigna vexillata)     बुरंबुळा ही गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस  बुरंबुळ्याचे वेल रुजून येतात. लोक याचे कंद, म्हणजेच ‘बुरंबुळे’  खणून आवडीने खातात. चवीला गोडुस लागतात. पावसाळा सुरु होऊन काही दिवस झाल्यानंतर मात्र पाणी मुरल्यामुळे हे बुरंबुळे पचपचीत लागतात. गडग्याच्या, दरडीच्या आधाराने वेल वाढतात. वेलीला बेलाच्या पानांसारखे त्रिदल असते. सप्टेंबरच्या […]

Read More »

Posted in वेलि

अंबटवेल

May 9, 2022
| No Comments
| वेलि

अंबटवेल (Causonis trifolia)     अंबटवेल ही वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. पंगेऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाळेच्या पुढे रस्त्याच्या कडेला ही वेल आढळून आली आहे. सड्यांवरही ही काही ठिकाणी आढळते. पावसाळ्यात या वेलीला हिरवी फळे येतात व नंतर ती काळी होतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – […]

Read More »

Posted in वेलि

झिंजर्डी

May 9, 2022
| No Comments
| वेलि

झिंजर्डी (Triumfetta rhomboidea)     पावसाळ्यात फुलणारे रानफुल. उंची साधारणतः तीन फुटांपर्यंत असते. फुले बारीक पिवळी असतात. पाने खरखरीत असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://www.facebook.com/groups/426670120680546/posts/4105212902826231/)

Read More »

Posted in वेलि

फुलोरा

May 9, 2022
| No Comments
| वेलि

फुलोरा (Senecio bombayensis)   फुलोरा ही पावसाळ्यात गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. प्रमाण मराठी भाषेत हिला ‘सोनकी’ म्हणतात, परंतु गावात सगळे लोक ‘फुलोरा’ या नावाने हिला ओळखतात. सड्यांवरती साधारणतः ऑगस्टच्या सुमारास फुलोरा फुलतो. आडभराडे शाळेच्या आजूबाजूचा परिसर, वाकी-भराडे सडा येथे, विशेषतः रस्त्याच्या कडेने फुलोरा भरपूर फुललेला दिसतो. याची उंची जास्तीत जास्त दोन ते अडीच […]

Read More »

Posted in वेलि

कुर्डू

May 9, 2022
| No Comments
| वेलि

कुर्डू (Celosia argentea)     कुर्डू ही वनस्पती पावसाळ्यात गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळते. विशेषतः शेतमळ्यांच्या बाजूने ही वनस्पती खास करून दिसते. कुर्डूच्या पाल्याची गावातले लोक भाजी करतात. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास कुर्डू फुलतात व नवरात्रात घराला कुर्डूचे घोस बांधतात. इंग्रजीमध्ये या वनस्पतीला Silver Cockscomb असे म्हणातात, तर संस्कृतमध्ये ‘मयुरशिखा’ असे नाव आहे. भारतात सर्वत्र, तर आशिया खंडातील […]

Read More »

Posted in वेलि

गोमेटी

May 9, 2022
| No Comments
| वेलि

गोमेटी (Solena amplexicaulis)     ही वेलवर्गीय वनस्पती गावात तुरळक प्रमाणात आढळते. शेजारचे छायाचित्र हे शेरीवाडीजवळील सड्यावर टिपलेले आहे. अगदी लहान आकाराच्या पिवळ्या फुलांवरून आणि तोंडल्यासारख्या नारिंगी फळावरून ही वेल ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Creeping%20Cucumber.html)

Read More »

Posted in वेलि

बिंब

May 8, 2022
| No Comments
| वेलि

बिंब (Cyperus sp.)     बिंब ही पावसाळ्यात गावात शेतांच्या कडेने, रस्त्याच्या कडेने विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ‘नागरमोथा’ म्हणून ओळखली जाणारी प्रजाती हीच असावी असा अंदाज आहे. गावात स्थानिक भाषेत लोक याला ‘बिंब’ म्हणतात. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त एक ते दीड फूट असते. अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://vishwakosh.marathi.gov.in/18774/)

Read More »

Posted in वेलि

Posts navigation

Previous 1 2 3 … 9 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com