Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: वेलवर्गीय/झुडूपी वनस्पती

तेरडा

May 8, 2022
| No Comments
| वेलि

तेरडा (Impatiens balsamina)     तेरडा ही पावसाळ्यात गावात सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात तेरडा भरपूर फुललेला दिसतो. शेतमळ्यांच्या कडेला हा तेरडा हमखास आढळून येतो. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त तीन फुटांपर्यंत असते. फुले गुलाबी रंगाची असतात. पाने लांबडी असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी […]

Read More »

Posted in वेलि

May 8, 2022
| No Comments
| वेलि

(murdannia spirata)    पावसाळ्यात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती. उंची जेमतेम दोन ते तीन इंच. तीन पाकळ्यांचे निळे फूल. खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

Read More »

Posted in वेलि

कचरा

May 8, 2022
| No Comments
| वेलि

कचरा  कचरा ही वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. रानहळद आणि कचऱ्याची पाने अगदी तंतोतंत दिसत असल्यामुळे दोघांमधील फरक ओळखणे कठीण जाते. कचऱ्याला रानहळदीसारखे फुल नसते. उंची साधारणतः दोन-अडीच फुटांपर्यंत असते. गावात पूर्वी कचऱ्याचे सत्व काढले जाई व ते औषधी होते. अलीकडे मात्र कचऱ्याचे सत्व कोणी काढत नाही.

Read More »

Posted in वेलि

जंगली सुरण

May 8, 2022
| No Comments
| वेलि

जंगली सुरण (————–

Read More »

Posted in वेलि

नीलकंठ

May 8, 2022
| No Comments
| वेलि

नीलकंठ (Asystasia dalzelliana)     नीलकंठ ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. छायाचित्रातील फोटो हा हेमंत वाडेकर यांच्या दुकानाजवळ काढलेला आहे. पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या सुमारास या वनस्पतीला कोरांटीसारखी लहान निळी फुले आलेली दिसतात. या वनस्पतीची उंची जेमतेम दोन फुटांपर्यंत असते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी […]

Read More »

Posted in वेलि

ढाल तेरडा

May 8, 2022
| No Comments
| वेलि

ढाल तेरडा (Impatiens pulcherrima)     ढाल तेरडा ही पावसाळ्यात गावात सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालयापासून शेवडीवाडीपर्यंत रस्त्याच्या कडेने साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात ढाल तेरडा भरपूर फुललेला दिसतो. या वनस्पतीची उंची तीन ते चार फुटांपर्यंत असते. फुले सदाफुलीसारखी गुलाबी रंगाची असतात. फुलाचा आकार ढालीसारखा असतो म्हणून याला ‘ढाल तेरडा’ म्हणतात.  ही वनस्पती […]

Read More »

Posted in वेलि

पाणलवंग

May 8, 2022
| No Comments
| वेलि

पाणलवंग (Ludwigia octovalvis)     पाणलवंग ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी पाणवनस्पती आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी, बागांमध्ये, शेतमळ्यांमध्ये ही आढळून येते. पावसाळ्यात ही जास्त प्रमाणात दिसते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त १ फुटापर्यंत असते. चार पाकळ्यांच्या बारीक पिवळ्या फुलांवरून ही वनस्पती ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी […]

Read More »

Posted in वेलि

लाजवंती

May 8, 2022
| No Comments
| वेलि

लाजवंती (Biophytum sensitivum)     लाजवंती ही गावात पावसाळा अखेरीस तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती जमिनीलगत ४ ते ५ इंचापर्यंत वाढते. पानांची रचना आवळा-चिंचेच्या पानांसारखी असते. पावसाळा अखेरीस या वनस्पतीला पिवळी-बारीक फुले येतात. गुरे चरताना ही वनस्पती बरेचदा त्यांच्याकडून खाल्ली जाते वा पायाखाली तुडवली जाते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात […]

Read More »

Posted in वेलि

सांजवेल

May 8, 2022
| No Comments
| वेलि

सांजवेल (Rivea hypocrateriformis)     सांजवेल ही गावात पावसाळ्यात सामान्य सडे व डोंगरउताराच्या भागात सामान्यपणे आढळणारी वनस्पती आहे. मारुतीच्या देवळापासून खाली उतरणाऱ्या डोंगरावर ही दरवर्षी हमखास आढळून येते. ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास हिला पांढरी धोत्र्यासारखी, परंतु लहान फुले येतात. पाने बदामाकृती, मध्यम आकाराची असतात. फुले सकाळी व संध्याकाळी उमलतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास […]

Read More »

Posted in वेलि

रानमेथी

May 8, 2022
| No Comments
| वेलि

रानमेथी (Desmodium triflorum)     रानमेथी ही गावात पावसाळ्यात रुजून येणारी, तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती अगदी जमिनीलगत, जेमतेम अर्धा इंचच वाढते. गर्द हिरव्या गोल बारीक पानांवरुन ही सहज ओळखता येते. गुरे ही वनस्पती खातात. पावसाळा अखेरीस हिला जांभळट गुलाबी रंगाची फुले येतात व जमिनीलगत फुलांचा गालिचा सुंदर दिसतो. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा […]

Read More »

Posted in वेलि

Posts navigation

Previous 1 2 3 4 … 9 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com