Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: स्थानिक वृक्ष

करंज

November 11, 2021
| No Comments
| Tree

करंज (Pongamia pinnata)  करंजाची लहान ते मध्यम उंचीची झाडे अत्यंत तुरळक प्रमाणात गावात विशेषतः पंगेरे खाडी रस्त्यावर आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. रस्त्याच्या आजूबाजूची साफसफाई करण्यात बरेचदा या झाडांची तोड होते. पाने लहान गर्द हिरवी असतात. उन्हाळ्यात पांढरीशुभ्र फुले येतात. करंजाच्या चपट्या बियांचे तेल काढले जाते व ते ‘करंजेल’ या नावाने ओळखले जाते. मात्र गावात […]

Read More »

Posted in Tree

करमाळी

November 11, 2021
| No Comments
| Tree

करमाळी (Dillenia pentagyna)   करमाळीचे मध्यम उंचीचे फक्त एकमेव झाड गावात श्री लक्ष्मीनारायण वाचनालयाशेजारी आहे. करमाळीची पाने केळीसारखी लांब-रुंद असतात. मार्च-एप्रिलच्या सुमारास याची पूर्ण पानगळ होते आणि पाच पाकळ्यांच्या पिवळ्या फुलांनी करमाळीचे झाड बहरते. मात्र याचा बहर फक्त एक-दोन दिवसांपुरताच असतो. त्यानंतर झाड बारीक फळांनी लगडते. पावसाळ्यात पुन्हा झाडाला नवीन पाने फुटतात. कारमाळीचा खाद्य, औषधी वा […]

Read More »

Posted in Tree

जांभूळ

November 11, 2021
| No Comments
| Tree

जांभूळ (Syzygium cumini)  जांभुळाचे मध्यम उंचीचे व जाडीचे वृक्ष तुरळक प्रमाणात गावात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. दांडेवाडी येथे जांभुळाची झाडे प्रामुख्याने आढळतात. गावाच्या मुख्य रस्त्यावर गुरांच्या दवाखान्याजवळ जांभळाची माध्यम उंचीची झाडे आहेत. जांभळांचे व्यावसायिक उत्पादन वा वापर गावात होत नाही. इमारती लाकडासाठी क्वचित जांभळाचे झाड तोडले जाते.  अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) मराठी विकिपिडिया […]

Read More »

Posted in Tree

चांदाडा

November 11, 2021
| No Comments
| Tree

चांदाडा (Macaranga peltata)  चांदाड्याची लहान खुरटी झाडे गावात सर्वत्र डोंगरउताराच्या जंगल भागात सामान्य प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. मध्यम उंचीची (१० ते ३० मी.) झाडे तुरळक प्रमाणात आहेत. मोठ्या आकाराच्या गोल पानावरुन चांदाड्याचे झाड सहज ओळखता येते. लोक या झाडाला ‘चांदा’ असंही म्हणतात. चांदाड्याचे पान नाष्ट्यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः हळदीकुंकवासारख्या समारंभाप्रसंगी आंबेडाळ वा अन्य […]

Read More »

Posted in Tree

आईन

November 11, 2021
| No Comments
| Tree

आईन (Terminalia elliptica)  आईनाची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात डोंगरउतारावरील जंगली भागात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. वाकी-भराडे येथील डोंगरउतारावरच्या जंगलात आईनाची लहान ते माध्यम उंचीची झाडे (१० ते ३० फूट) विपुल प्रमाणात आहेत. इमारती बांधकामासाठी लाकूड उपयोगी असल्याने या झाडांची तोड होते. आईन आणि किंजळ यांच्यात फरक ओळखणे कठीण जाते, मात्र […]

Read More »

Posted in Tree

आमण

November 11, 2021
| No Comments
| Tree

आमण (Trewia polycarpa)  आमणीची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठे वृक्ष आढळात नाहीत. पांढरट करड्या रंगाचे खोड व मोठी, बदामी आकाराची, किंचित पोपटी रंगाची रुंद पाने यामुळे आमणीची झाडे सहज ओळखू येतात. आमणीची पाने नाष्ट्यासाठी उपयोगी पडतात. उन्हाळ्यात या झाडाला हिरवी करवंदासारखी फळे येतात व अनेक पक्षी ही फळे खाण्यासाठी येतात. […]

Read More »

Posted in Tree

बारतोंडी

November 11, 2021
| No Comments
| Tree

बारतोंडी (Morinda pubescens) बारतोंडीची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात सर्वत्र, विशेषतः सड्यांच्या आजूबाजूला व डोंगरउतारावरच्या झुडुपांमध्ये सामान्य प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. तपकिरी रंगाचे खाचा पडलेले खोड व मध्यम आकाराची जाड लुसलुशीत पाने यावरून हे झाड ओळखू येते. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य व्यावसायिक उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ […]

Read More »

Posted in Tree

चिंच

November 11, 2021
| No Comments
| Tree

चिंच (Tamarindus indica)  चिंचेची मध्यम आकाराची झाडे व मोठे वृक्ष गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. चिंच हा गावातल्या लोकांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. आमसोलाप्रमाणेच चिंचेचे आंबट आमटी-भाजीत वापरतात. साधारणतः फेब्रुवारी महिन्यात चिंचा परिपक्व होतात. झाड हलवून त्या पाडल्या जातात. त्यावर काही प्रक्रिया करून टिकाऊ चिंच तयार होते. चिंचेच्या बिया (चिंचोके) भाजून खाण्यास उपयुक्त. चिंचेपासून अन्य […]

Read More »

Posted in Tree

काळा धूप

November 11, 2021
| No Comments
| Tree

काळा धूप (Canarium strictum) काळा धूप हे झाड गावात अत्यंत दुर्मिळ आहे. ग्रामस्थ श्री. वसंत तुळपुळे यांच्या घराजवळ नुकतेच एक नवीन झाड लावण्यात आले आहे. ग्रामस्थ श्री गजानन (विजू) देसाई यांच्या घरी पूर्वी धुपाचा वृक्ष होता अशी माहिती मिळते. धुपाच्या झाडाच्या बुंध्यातून जो चीक येतो तो खरा नैसर्गिक धूप होय. हा धूप कसा काढतात याबाबत […]

Read More »

Posted in Tree

कंक्री

November 11, 2021
| No Comments
| Tree

कंक्री   कंक्रीची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळतात. हे झाड दिसायला खैरासारखे असते. वर्षातून दोनदा या झाडाला पिवळी फुले येतात. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य व्यावसायिक उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/20257/) 2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Dhaman.html)

Read More »

Posted in Tree

Posts navigation

Previous 1 … 4 5 6 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com