गोकर्ण
गोकर्ण (Clitoria ternatea)) गोकर्णीची झुडुपे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. धार्मिक कार्यांमध्ये गोकर्णीची फुले वापरली जातात. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास गोकर्णीला निळी फुले येतात. पांढरी गोकर्णही गावात क्वचित आढळते. गोकर्णीचा खाद्य, औषधी वा अन्य व्यावसायिक उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Clitoria_ternatea)
