Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: वेलि

पाडावळ

January 13, 2022
| No Comments
| वेलि

पाठा/पाडावळ (Cissampelos pareira)  पाठा / पाडावळ ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. दगडांच्या फटींतून पावसाळ्यात ही रुजून येते. जेमतेम दोन ते तीन फूट वाढते. पाने बदामी आकाराची, लहान, किंचित पोपटी असतात. या वनस्पतीला ‘पाठा’ म्हणावे का ‘पाडावळ’ म्हणावे याबाबत संभ्रम आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.  अधिक […]

Read More »

Posted in वेलि

निगडी

January 13, 2022
| No Comments
| वेलि

निगडी (Vitex negundo)   निगडीची लहान उंचीची झुडुपे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. लांबडी पाने व निळसर फुलांच्या मंजरीवरून निगडीचे झाड ओळखता येते. निगडीचे झाड औषधी आहे. निगडीचा पाला माणसांच्या तसेच गुरांच्या त्वचारोगांवर वापरतात. शेतात उंदीर व अन्य प्राण्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी निगडीचा पाला उपयोगी पडतो. डासांचा उपद्रव कमी व्हावा यासाठी निगडीच्या पाल्याची धुरी करतात असे […]

Read More »

Posted in वेलि

लूत

January 13, 2022
| No Comments
| वेलि

लूत   लूत ही पावसाळ्यात उगवणारी सुरणासारखी वनस्पती. सुरणाचे खोड पांढरट असते, तर लुतीचे खोड काळपट असते त्यावरून ती ओळखता येते. ही वनस्पती ३ ते ४ फुटांपर्यंत उंच वाढते. ही खाद्य वनस्पती आहे. अनेक भागांत ही पावासाळी रानभाजी म्हणून प्रचलित आहे; मात्र या वनस्पतीला खूप खाज असल्याने गावात ही सहसा आहारात वापरली जात नाही. पूर्ण माहिती […]

Read More »

Posted in वेलि

कुसर

January 13, 2022
| No Comments
| वेलि

कुसर (Jasminum malabaricum)  ‘कुसर’ अथवा ‘रान मोगरा’ ही वनस्पती गावात विशेषतः सड्यांवरती तुरळक प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात या वनस्पतीला कुंदासारखी पांढरीशुभ्र सुगंधी फुले येतात. पाने लहान, गोलाकार, किंचित पोपटी, टोकाला निमुळती असतात.गावात या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (http://wildedibles.teriin.org/index.php?album=Wild-edibles/Fruits/Jasminum-malabaricum) 2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Malabar%20Jasmine.html)

Read More »

Posted in वेलि

केना

January 13, 2022
| No Comments
| वेलि

केनी (Commelina benghalensis)   ‘केना’ अथवा ‘केनी’ ही पावसाळ्यात गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती जमिनीलगत वाढते. निळ्या टपोऱ्या फुलांमुळे ही ओळखू येते. केनी ही रानभाजी म्ह्णून पावसाळ्यात अनेक ठिकाणी खाल्ली जाते. मात्र गावात रानभाजी म्हणून सर्रासपणे आहारात हिचा समावेश नसतो. गुरं ही वनस्पती चार म्हणून खातात. संपूर्ण पावसाळाभर ही वनस्पती आढळते मात्र […]

Read More »

Posted in वेलि

कर्टोली

January 13, 2022
| No Comments
| वेलि

कर्टोली (Momordica dioica)   कर्टोली ही पावसाळ्यात गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. पावसाळी रानभाजी म्हणून गावातील लोकांच्या आहाराचा भाग आहे. याची फळं गावात ‘काटलं’ या नावाने ओळखली जातात व त्यांची भाजी केली जाते. शेतांना, बागांना केलेल्या कुंपणांवर, गडग्यांवर ही वेल प्रामुख्याने दिसते. पिवळ्या मोठ्या आकाराच्या फुलावरून ही वनस्पती ओळखता येते. जुलै-ऑगस्र्टच्या सुमारास या […]

Read More »

Posted in वेलि

कारीट

January 13, 2022
| No Comments
| वेलि

कारीट (Cucumis sp.)  कारिटाचे वेल पावसाळ्यात सर्वत्र रुजून येतात. मोठ्या खरखरीत पोपटी पानांवरुन व पिवळ्या छोट्या फुलांवरून हे वेल ओळखता येतात. कारीट आणि काकडी हे एकाच जातीतले असल्याने दोन्हींचे वेल सारखेच दिसतात. कधीकधी कारिटाचा संकर होऊन काकड्या कडू होतात असा गावातल्या लोकांचा अनुभव आहे. याचे फळ, म्हणजेच ‘कारीट’ हे चवीला कडू असून खाण्यास उपयोगी नाही. […]

Read More »

Posted in वेलि

करवंद

January 13, 2022
| No Comments
| वेलि

करवंद (Carissa congesta)  करवंदाच्या झाळ्या गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आहेत. ५ ते १० फूट उंचीची करवंदाची झुडुपे सड्यांवरती, शेताच्या, बागांच्या आजूबाजूला आढळतात. मे महिन्यात पिकलेली करवंदे गावात आवडीने खाल्ली जातात. कच्ची करवंदेही खातात. करवंदांपासून अन्य कोणते उत्पादन (लोणचे, इ.) गावात घेतले जात नाही. शेतांच्या, बागेच्या कुंपणासाठी करवंदाच्या काटेरी झाळ्यांचा उपयोग होतो. अधिक माहितीसाठी संदर्भ – […]

Read More »

Posted in वेलि

कडू करांदा

January 13, 2022
| No Comments
| वेलि

कडू करांदा (Dioscorea Bulbifera)  कडू करांद्याचे वेल गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतात. बदामाकृती मोठ्या हिरव्या पानावरुन हे वेल ओळखता येतात. पावसाळा अखेरीस वेलींना जांभळट रंगाची तुरेयुक्त फुले येऊन त्यांना करांदे धरतात. हे करांदे कडू असल्याने खाण्यासाठी यांचा उपयोग सहसा केला जात नाही. दुसरे काळ्या रंगाचे ‘गोडे करांदे’ गावात काही लोकांकडे आहेत. यांची भाजी केली जाते. […]

Read More »

Posted in वेलि

कापरी कमळ

January 13, 2022
| No Comments
| वेलि

कापरी कमळ (Corynandra elegans)  कापरी कमळ हे पावसाळ्यात उगवणारे एक रानफुल आहे. गावात हे अत्यंत दुर्मिळ आहे. वाकीच्या सड्यावर चव्हाणवाडीकडे जाताना रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी हे फूल आढळले आहे. गावाच्या जवळ करेल-निवेलीच्या सड्यावर हे फूल मोठया संख्येने आढळते. पश्चिम घाटातले हे एक अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचे फूल आहे. यांच्या रोपाची उंची जास्तीत जास्त ३ ते […]

Read More »

Posted in वेलि

Posts navigation

Previous 1 … 6 7 8 9 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com