चारोळी

चारोळी (Buchanania lanzan) चारोळीची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते २० फूट) गावात सामान्य प्रमाणात आढळतात. म्हैसासुर वाडी, वाकी-भराडे येथील डोंगरउतारांवर विशेष करून या झाडांचा आढळ आहे. मोठा वृक्ष आढळात नाही. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास चारोळीच्या झाडांना फळे येतात त्यांना गावात ‘चारणं’ म्हणतात. पिकलेली चारणं खायला मधुर लागतात. पक्षी मोठ्या प्रमाणावर पिकलेली चारणं खातात […]