Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Month: April 2022

तिरफळ

April 5, 2022
| No Comments
| Tree

तिरफळ (Zanthoxylum rhetsa) तिरफळाची लहान ते मध्यम (१० ते ३० फूट) उंचीची झाडे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. तेलीवाडी परिसरात तिरफळाची झाडे जास्त प्रमाणात आहेत. काटेरी खोडामुळे तिरफळाचे झाड सहज ओळखू येते. गावात तिरफळांचा वापर फारसा केला जात नाही. उन्हाळ्यात काही लोक तिरफळांचे संकलन करून राजापूरच्या बाजारात विकतात. पावसाळ्यात तिरफळाच्या झाडाला पिवळी बारीक फळे येतात […]

Read More »

Posted in Tree

शिवण

April 5, 2022
| No Comments
| Tree

शिवण (Gmelina arborea)  शिवणीची मध्यम ते मोठ्या उंचीची झाडे (२० ते ४० फूट) गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. फळ्या पाडण्यासाठी, तसंच छोट्या लाकडी वस्तू, फर्निचर बनवण्यासाठी शिवणीच्या लाकडाचा वापर सर्रास केला जातो. शिवणीचे झाड तोडल्यानंतर तिथेच पुन्हा फुटवे येऊन नवीन झाड वाढते व १५-२० वर्षांत लाकूड जून होते. लाकूड टिकावू होण्यासाठी लोक थोडे दिवस खाऱ्या […]

Read More »

Posted in Tree

उंबर

April 5, 2022
| No Comments
| Tree

उंबर (Ficus racemosa)  उंबराची मध्यम ते मोठ्या उंचीची झाडे गावात तुरळक प्रमाणात आहेत. पंगेरे वाडी येथे एका महावृक्षाची नोंद झाली आहे. उंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व असल्याने शक्यतो तोडले जात नाही. गावात काही घरांच्या बाजूला महापुरुष म्हणून उंबराची झाडे जपली गेली आहेत. उंबराचे पाणी काढण्याची पद्धत गावात ज्ञात आहे. उंबराचे पाणी शीतल मानले जाते व पिण्यासाठी, […]

Read More »

Posted in Tree

चिकू

April 5, 2022
| No Comments
| पिके

चिकू चिकूची झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. व्यावसायिक तत्त्वावर चिकूची लागवड गावात नाही. घरांच्या आजूबाजूला एखाद-दुसरे चिकूचे झाड आढळते. कांडेचोर आणि वाघळे चिकू मोठ्या प्रमाणावर खाऊन टाकतात. वन्य प्राण्यांच्या तावडीतून वाचून काही चिकू हाती लागले तर गावातल्या गावात त्यांची खरेदी-विक्रीही होते.

Read More »

Posted in पिके

सागवान

April 5, 2022
| No Comments
| Tree

सागवान (Tactona grandis)  सागवानाची लहान, मध्यम व मोठया उंचीची झाडे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. गावठाण भागात सागवान जास्त प्रमाणात आहेत. इमारती बांधकामासाठी व छोट्या लाकडी वस्तू बनवण्यासाठी सागवानाचा वापर गावात सर्रास होतो. सागवानाचे झाड साधारणतः १५ तें २० वर्षांचे झाले की जून तोडण्यायोग्य होते. तोडल्यानंतर तिथेच नवीन फुटवे येतात. ३०-४० वर्षे जुने सागवानही […]

Read More »

Posted in Tree

वारस

April 4, 2022
| No Comments
| Tree

वारस (Heterophragma quadriloculare)  वारस हे गावात अतिदुर्मिळ असणारे झाड आहे. आडीवाडी व भराडेवाडी येथे मध्यम उंचीच्या दोन झाडांची नोंद झाली आहे. उन्हाळ्यात वारस वृक्षाला पांढरी मोठी फुले येतात. हे जंगली झाड असून गावातील लोकजीवनात याला फारसे महत्त्व नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (https://indiabiodiversity.org/species/show/229922)

Read More »

Posted in Tree

ऑस्ट्रेलियन बाभूळ

April 3, 2022
| No Comments
| अस्थानिक

ऑस्ट्रेलियन बाभूळ (Acacia auriculiformis)   ऑस्ट्रेलियन बाभूळ हे झाड गावात सामान्य प्रमाणात आढळते. दांडे-पंगेरे परिसरात रस्त्याच्या कडेने या झाडाची लागवड केलेली आढळते. १० ते १५ फूट उंचीची झाडे गावात आढळतात. या झाडाचा गावात काही उपयोग केला जात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://en.wikipedia.org/wiki/Acacia_auriculiformis)

Read More »

Posted in अस्थानिक

कोकर

April 3, 2022
| No Comments
| Tree

कोकर (Sterculia guttata) कोकर हे झाड गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळते. आडीवाडीत कोकराच्या मध्यम उंचीच्या (अंदाजे १५ फूट) दोन झाडांची नोंद झाली आहे. वाकीच्या सड्यावर एक मोठे झाड आढळते. स्थानिक लोक याला ‘कुवर’ असेही म्हणतात. लाल मोठ्या फळांवरून हे झाड सहज ओळखता येते. लाल फळात काळ्या बिया असतात. हुर्से वाडी येथील वहाळात मध्यम उंचीची काही […]

Read More »

Posted in Tree

मोतिया

April 3, 2022
| No Comments
| वेलि

मोतिया (Camonea umbellata) पावसाळा संपल्यावर फुलणारी ही एक वेलवर्गीय वनस्पती गावात तुरळक ठिकाणी आढळते. दांडे, म्हैसासुर वाडी, दळवी वाडी येथे ही वेल आढळून आली आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Hogvine.html)

Read More »

Posted in वेलि

कोचं

April 3, 2022
| No Comments
| वेलि

कोचं   सड्यांवरील कातळांच्या फटींतून रुजणारी, जमिनीलगत, जास्तीत जास्त बोटभर उंच वाढणारी ही वनस्पती गावात ‘कोचं’ या नावाने ओळखली जाते. याच्या पात्या तीक्ष्ण असल्याने अनवाणी फिरताना पायाला बोचतात. गुरं ही वनस्पती खातात. शेरीवाडी, तसेच वाकी-भराडे या सड्यांवर ही सामान्य प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कोचांना पिवळी व पांढरी बारीक फुलं येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग […]

Read More »

Posted in वेलि

Posts navigation

Previous 1 2 3 4 … 6 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com