Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Month: April 2022

मर्यादवेल

April 3, 2022
| No Comments
| वेलि

मर्यादवेल (Ipomoea pes-caprae) मर्यादवेल ही दांडे-पंगेरे समुद्रकिनारी विपुल प्रमाणात आढळते. ही वनस्पती जमिनीलगत वाढते. पाने जाड, गोल, लहान असतात. डिसेंबरच्या सुमारास या वेलीला जांभळट गुलाबी रंगाची धोत्र्यासारखी मोठी फुले येतात. समुद्रकिनाऱ्याच्या धूप रोखण्यात या वनस्पतीचा मोठा वाटा आहे. अलीकडे किनाऱ्यावर सुरुची लागवड झाल्याने या वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य […]

Read More »

Posted in वेलि

बोर

April 3, 2022
| No Comments
| Tree

बोर (Ziziphus sp.)  बोराची लहान खुरटी झुडुपे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. पंगेऱ्याच्या बांधाच्या कडेने भरपूर आहेत. मध्यम उंचीचे वृक्ष (२० फुटांपर्यंत) गावात तुरळक प्रमाणात आहेत. या झाडांनां लहान करवंदाएवढ्या आकाराची बोरे धरतात व शाळेत जाणारी-येणारी मुले ती आवडीने खातात. बोरापासून कुठले व्यावसायिक उत्पादन गावात घेतले जात नाही. बोरासारखेच दिसणारे दुसरे झुडूप असते त्याला गावात […]

Read More »

Posted in Tree

एरंड

April 3, 2022
| No Comments
| Tree

एरंड (Ricinus sp.)  एरंड हे गावात अतिदुर्मिळ असणारे झाड आहे. एरंडाच्या एकच लहान झाडाची नोंद गावात झाली आहे. एरंडाचे औषधी उपयोग अनेक आहेत मात्र गावात याचा फारसा वापर होत नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) विकिपिडिया (https://vishwakosh.marathi.gov.in/21862/)

Read More »

Posted in Tree

टेटू

April 3, 2022
| No Comments
| Tree

टेटू (Oroxylum indicum)   टेटू हे गावात अतिदुर्मिळ असणारे झाड आहे. वाकी-भराडे येथे टेटूच्या लहान उंचीच्या (१५ फुटांपर्यंत) उंचीच्या दोन झाडांची नोंद झाली आहे. फूटभर लांबीच्या नारळाच्या पोयांसारख्या असलेल्या शेंगांमुळे हे झाड ओळखू येते. हे जंगली झाड असून गावातील लोकजीवनात याला फारसे स्थान नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) विकिपिडिया (https://www.facebook.com/umesh.mundlye/posts/1975872192440474)

Read More »

Posted in Tree

काजरा

April 3, 2022
| No Comments
| Tree

काजरा (Strychnos nux-vomica) काजऱ्याची मध्यम ते मोठ्या उंचीची झाडे (१० ते २५ फूट) गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. रस्त्याच्या कडेने, रानावनांत काजऱ्याची छोटी रोपे भरपूर प्रमाणात रुजून येतात. काजऱ्याला सर्वसाधारणपणे वर्षातून दोनदा मोठी लाल फळे येतात. काजऱ्याच्या बिया चपट्या असतात. बिया विषारी समजल्या जातात, मात्र त्या औषधीही आहेत. नागीण झाल्यास कजाऱ्याची बी उगाळून लावतात, […]

Read More »

Posted in Tree

करंजवेल

April 3, 2022
| No Comments
| वेलि

करंजवेल (Derris trifoliata) करंजवेल ही गावात खाडीकिनारी सामान्य प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. पंगेरे रस्ता, दांडे खाडी रस्ता येथे ही विपुल प्रमाणात आढळते. साधारणतः पावसाळ्यात या वनस्पतीला पांढऱ्या फुलांचे तुरे येतात. ते करंजाच्या फुलांसारखे दिसतात म्हणून या वेलीला ‘करंजवेल’ नाव पडले असावे. फळेही करंजासारखीच असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.  […]

Read More »

Posted in वेलि

बांडगूळ

April 2, 2022
| No Comments
| वेलि

बांदी (Dendrophthoe falcata)   ‘बांदी’ किंवा बांडगुळ ही झाडांवर वाढणारी वनस्पती आहे. गावात आंब्यांच्या झाडांवर ही बांदी सर्रासपणे वाढलेली दिसते. झाडाच्या फांदीतून ती रुजून येते. बांदी जास्त वाढली तर झाडातली अन्नद्रव्ये शोषली जाऊन झाड कमकुवत होण्याचा धोका असतो. म्हणून गावात स्थानिक लोकांकडून ही वेळोवेळी उपटून टाकली जाते. उन्हाळ्यात या वनस्पतीला केळफुलासारखी बारीक पांढरट पिवळी फुले […]

Read More »

Posted in वेलि

खोटा अशोक

April 2, 2022
| No Comments
| अस्थानिक

खोटा अशोक खोटा अशोक हा गावात तुरळक प्रमाणात आढळणारा वृक्ष आहे. अणसुरे आड-भराडे शाळा, गिरेश्वर मंदिर येथे मध्यम उंचीची (३० फुटांपर्यंत) लागवड केलेली झाडे आहेत.

Read More »

Posted in अस्थानिक

पोपया

April 2, 2022
| No Comments
| पिके

पोपया पपईला गावात ‘पोपया’ म्हणतात. पोपयाची गावात व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवड नाही. घरांच्या आजूबाजूला एखाद-दुसरे पोपयाचे झाड लोकांनी लावलेले आढळते. साधारणपणे १० फूट उंचीची पोपयाची झाडे गावात आढळतात. यात काही गावठी पारंपरिक वाणे आहेत, तर काही बाहेरून आणून लावलेली आहेत. पोपयाच्या झाडाला रोज नियमितपणे पाणी द्यावे लागते. नवीन रोप रुजून आल्यानंतर दोन-तीन वर्षांमध्ये झाडाला […]

Read More »

Posted in पिके

नेचे

April 2, 2022
| No Comments
| वेलि

नेचे (Terminalia paniculata) नेचे ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. बागांमध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी ही सामान्यपणे आढळते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसते. नेचेवर्गीय वनस्पतींना फळे, फुले व बिया अजिबात नसतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात कुठे केला जात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/19798/) 2) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Fern)

Read More »

Posted in वेलि

Posts navigation

Previous 1 … 3 4 5 6 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com