Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Month: May 2022

नीलांग

May 19, 2022
| No Comments
| पक्षी

छायाचित्र – उन्मेष परांजपे स्थळ: लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ नीलांग  नीलांग हा छोट्या आकाराचा पक्षी गावात नेहमी सगळीकडे आढळतो. घराभोवती, बागांमध्ये हा विशेष करून दिसतो. पोटाजवळचा रंग नारिंगी असतो व बाकी निळा असतो. मातीच्या घरांच्या कोनाड्यांमध्ये हा पावसाळ्यात घरटे करतो. मांजरे बरेचदा या पक्ष्याची अंडी खातात. हवेत उडणारे कीटक, माशा, इ. याचे अन्न आहे.

Read More »

Posted in पक्षी

शुभ्रकंठी कस्तुर

May 19, 2022
| No Comments
| पक्षी

छायाचित्र – उन्मेष परांजपे स्थळ: लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ शुभ्रकंठी कस्तुर शुभ्रकंठी कस्तुर हा गावात सर्वत्र नेहमी आढळणारा पक्षी आहे. घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, बागांमध्ये, डोंगरउताराच्या जागेत हा दिसतो. हा विशेष करून जमिनीवर वावरतो. जमिनीवरच्या अळ्या, किडे इ. खातो. २ ते ४ या संख्येत हे पक्षी दिसतात. मार्च ते मे या कालावधीत खूप वेगवेगळ्या सुंदर आवाजांमध्ये हा पक्षी […]

Read More »

Posted in पक्षी

कापशी

May 19, 2022
| No Comments
| पक्षी

छायाचित्र – उन्मेष परांजपे कापशी  कापशी हा गावात केव्हातरी दिसणारा दुर्मिळ पक्षी आहे. हा पक्षी खास करून सड्यांवरच्या भागात, वा खाडीकिनाऱ्याच्या भागात आढळतो. विजेच्या तारांवरती हा खास करून बसलेला दिसतो. हा शिकारी पक्षी आहे.

Read More »

Posted in पक्षी

तिवर

May 19, 2022
| No Comments
| mangroves

तिवर (Avicennia marina) तिवर ही अणसुरे खाडी पट्ट्यात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. तिवराचे २० फुटांपर्यंत उंच वृक्ष अणसुरे खाडीपट्ट्यात आढळतात. भराडे, दांडे या भागात तिवरांचे वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. पिवळी बारीक फुले, काजूसारख्या बिया, लहान आकाराची पाने यावरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. कांदळवन पट्ट्यात तिवराची झाडे सर्वाधिक उंच वाढतात. तिवर हे गुरांचे […]

Read More »

Posted in mangroves

झुंबर

May 19, 2022
| No Comments
| mangroves

झुंबर (Bruguiera gymnorhiza) झुंबर ही अणसुरे खाडीच्या कांदळवन पट्ट्यात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. लांब टोकदार गर्द हिरवे पान व गुलाबी रंगाचे छोटे फुल यावरून ही वनस्पती ओळखता येते. उंची जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत असते. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास या वनस्पतीला फुले येतात व मागोमाग शूट्स येतात. हे शूट्स खाली पडून चिखलात रुततात व […]

Read More »

Posted in mangroves

सुगंधा

May 19, 2022
| No Comments
| mangroves

सुगंधा (Aegiceras corniculatum) सुगंधा/काजळा ही गावात कांदळवन पट्ट्यात विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. दांडे खाडी, अणसुरे खाडी, भराडे, हुर्से इ. सर्व भागांतील कांदळवन पट्ट्यात ही आढळते. बोटाएवढ्या लांबीच्या शेंगा आणि पांढरीशुभ्र सुगंधी फुले यांवरून ही ओळखता येते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त ५ ते ७ फुटांपर्यंत असते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात […]

Read More »

Posted in mangroves

कलमी आंबा

May 18, 2022
| No Comments
| पिके

कलमी आंबा कोकणाचा राजा असलेला ‘हापूस आंबा’ हे गावातले सर्वाधिक लागवड असलेले आणि सर्वाधिक उत्पन्न असलेले बागायती पीक आहे. गावात हापूस आंब्याची १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडेही आहेत, मात्र बहुतांश हापूस लागवड ही गेल्या २० ते ४० वर्षांतील आहे. हापूसच्या बागा या मुख्यतः डोंगरउतारावर आढळतात व काही प्रमाणात कातळसड्यांवर देखील लोकांनी बागा केल्या आहेत. एका […]

Read More »

Posted in पिके

सुपारी

May 18, 2022
| No Comments
| पिके

सुपारी सुपारी हे गावातले एक प्रमुख बागायती पीक आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३० फूट उंचीपर्यंतच्या जमिनीत सुपारीचे पीक घेतले जाते. सुपारीची लागवड गावठाण भागात जास्त आहे. सुपारीची गावठी जात गावात आढळते. पूर्ण वाढ झालेल्या पोफळीची उंची ६० फुटांपर्यंत असते. एका सुपारीच्या बागेचे क्षेत्र साधारणपणे ३ ते १० गुंठ्यांपर्यंत असते. बऱ्याच लोकांनी नारळ आणि सुपारीची मिश्र लागवड […]

Read More »

Posted in पिके

नारळ

May 18, 2022
| No Comments
| पिके

नारळ    नारळ हे गावातले एक मुख्य बागायती पीक आहे. लोकांनी आपल्या घराभोवतीच्या जागेत माडांची मुद्दाम लागवड केलेली आहे, तर खाडीकिनारी अनेक माडाची झाडे आपोआपसुद्धा रुजून आलेली व उंच वाढलेली आढळतात. दांडे-पंगेरे परिसरात माडाची झाडे विपुल प्रमाणात आहेत. झाडाची लागवड समुद्रसपाटीलगतच्या जमिनीत होते. एका बागेत सर्वसाधारणपणे २० ते ४० या प्रमाणात माड आढळतात. जुने माड […]

Read More »

Posted in पिके

काळी मिरी

May 18, 2022
| No Comments
| पिके

काळी मिरी  काळी मिरी हे गावात बागांमध्ये घेतले जाणारे आंतरपीक आहे. माड, पोफळी, आंब्याची झाडे यांवर मिरीचे वेल सोडतात. पावसाळ्यात पाळांना फुटलेले नवीन वेल दुसऱ्या ठिकाणी लावता येतात. लागवड केल्यापासून तीन वर्षांत मिरी धरायला लागते. जूनच्या सुमारास मिरीला बारीक बारीक केसरं यायला लागतात व जानेवारीमध्ये मिरी काढायला तयार होते. मिरीचे पिकलेले दाणे हे बुलबुल व […]

Read More »

Posted in पिके

Posts navigation

Previous 1 2 3 … 7 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com